मोगरा फुलला (३)
दंवबिंदूचा आभाळाशी जणू दुवा जुळला
क्षितिजावर लालिमा हसली, मोगरा फुलला !
नवा नवा भासतो चेहरा आज मला अपुला
हा नजरेचा कौल अनोखा, मोगरा फुलला !
घरट्यातून पाखरे उडाली, किरणांची रांगोळी सजली
तरुण आशा अन् स्वप्नांनी दिवसांची ओंजळ भरलेली
एक कवडसा असा झळकला, मोगरा फुलला !
हात तुझा हातात गुंफला, मोगरा फुलला !
कुठे हे सुखाचे घरटे आहे, अवघे जीवन शोधू पाहे
जिथे मनाला मिळे विसावा खरे सूख ते तिथेच आहे
जुनेच घरकुल त्याचा मजला अर्थ नवा कळला
हाक दिली अन् साद मिळाली, मोगरा फुलला
विणला जावा तनामनाचा नाजूक सुंदर गोफ दुहेरी
जसे चांदण्यावर कोरावे रुणझुणते ऊन हे सोनेरी
जगणे आहे रंगबेरंगी इंद्रधनुचा झुला

गीत | - | चंद्रशेखर सानेकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | सुरेश वाडकर |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- मोगरा फुलला, वाहिनी- मी मराठी. |