A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मोहरले मस्त गगन

मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी, देहाची भिंगरी!

मंथर अनोखे हे पुकारे
भोवताली दाटले
छंदी अनंगाचे इशारे
रोमरोमी नाचले
नजरेची कस्तुरी दरवळली अंतरी
थरथरली शर्वरी रे साजणा!

चंचल्‌ नशेचे हे उखाणे
लोचनांनी छेडिले
फंदी तरंगांचे पिसारे
अंतरंगी रंगले
श्वासांची मोहिनी लखलखली अंबरी
धुंदी ही वादळी रे साजणा!
अनंग - मदन.
कवन - काव्य.
फंद - नाद / व्यसन.
मंथर - मंद, हळू चालणारा.
शर्वरी - रात्र.