A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मुक्या मनाचे बोल सजणा

मुक्या मनाचे बोल सजणा, बोल झाले फोल

चंदेरी दर्यात वितळल्या सोनेरी तारा
पानांच्या कानांत कुजबुजे हलके हलके वारा
सुनासुना किती शांत शांत अन्‌ होता सर्व किनारा
पिकल्या फळांत चोच खुपसुनी तोच, उडुन जाय चंडोल

हृदयाच्या अंधारात नाव तुझे मी आठवते
दो नयनांच्या ऐन्यात चित्र तुझे मी साठवते
नि:श्वासांच्या कवनांत पत्र तुला मी पाठवते
सखया, तुझ्याविना भरेचना जखम उरातील खोल
कवन - काव्य.
चंडोल - एक पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.