मुरलीधर घनश्याम सुलोचन
मुरलीधर घनश्याम सुलोचन
मी मीरा, तू माझे जीवन
तुझ्या मूर्तिविन या डोळ्यांना
कृष्ण सख्या रे काही दिसेना
एकतारीच्या सुरांत माझ्या
तुझेच अवघे भरले चिंतन
श्यामल तनुचा तव देव्हारा
जीव-ज्योतीला माझ्या थारा
चिंतनात मी रमते तुझिया
सोबत करताळांची किणकिण
विषासही तू अमृत केले
या वेडीला जीवन दिधले
हे उरलेले जीवित माझे
तुला मुकुंदा करिते अर्पण
मी मीरा, तू माझे जीवन
तुझ्या मूर्तिविन या डोळ्यांना
कृष्ण सख्या रे काही दिसेना
एकतारीच्या सुरांत माझ्या
तुझेच अवघे भरले चिंतन
श्यामल तनुचा तव देव्हारा
जीव-ज्योतीला माझ्या थारा
चिंतनात मी रमते तुझिया
सोबत करताळांची किणकिण
विषासही तू अमृत केले
या वेडीला जीवन दिधले
हे उरलेले जीवित माझे
तुला मुकुंदा करिते अर्पण
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | कुमुद भागवत |
राग | - | बिभास, भटियार |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |