A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाम तेंचि रूप

नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम ।
नामारूप भिन्‍न नाहीं नाहीं ॥१॥

आकारला देव नामरूपा आला ।
ह्मणोनी स्थापिलें नामवेदीं ॥२॥

नामापरता मंत्र नाहीं हो आणिक ।
सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥३॥

नामा ह्मणें नाम केशव केवळ ।
जाणती प्रेमळ भक्त भले ॥४॥
गीत - संत नामदेव
संगीत -
स्वराविष्कार- मालती पांडे ( बर्वे )
सुरेश वाडकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - संतवाणी
  
टीप -
• स्वर- मालती पांडे (बर्वे), संगीत- ???.
• स्वर- सुरेश वाडकर, संगीत- प्रभाकर पंडित.

 

  मालती पांडे ( बर्वे )
  सुरेश वाडकर