नाव तुझे ते येता श्रवणी
नाव तुझे ते येता श्रवणी
एकान्ती मी जाते लाजुनी
पापणीचे ते पंख पसरुनी
नयनांमधले बुलबुल दोन्ही
एक सुराने गाती मिळुनी
फुलतो गाली गोड लालिमा
एका वेळी पूर्व-पश्चिमा
हसते शोभा खळीत लपुनी
तोच पारवा येतो कुठुनी
गढीत उरीच्या घुमतो फिरुनी
निळ्या गढीचे हलते पाणी
एकान्ती मी जाते लाजुनी
पापणीचे ते पंख पसरुनी
नयनांमधले बुलबुल दोन्ही
एक सुराने गाती मिळुनी
फुलतो गाली गोड लालिमा
एका वेळी पूर्व-पश्चिमा
हसते शोभा खळीत लपुनी
तोच पारवा येतो कुठुनी
गढीत उरीच्या घुमतो फिरुनी
निळ्या गढीचे हलते पाणी
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | तारका |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
पारवा | - | कबुतराची एक जात किंवा त्याच्या रंगाचा. |