नाच लाडके नाच
नाच लाडके नाच
जगापासुनी दूर राहूया, नको जनांचा जाच
तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे
तुझ्या संगती फुलुनी येती अंगावर रोमांच
तुझी नि माझी अखंड संगत
प्रीती दैवत प्रीतच दौलत
तुझ्या नर्तनी धूळ उडे ती हिरे-माणके-पांच
जगापासुनी दूर राहूया, नको जनांचा जाच
तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे
तुझ्या संगती फुलुनी येती अंगावर रोमांच
तुझी नि माझी अखंड संगत
प्रीती दैवत प्रीतच दौलत
तुझ्या नर्तनी धूळ उडे ती हिरे-माणके-पांच
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | पडछाया |
गीत प्रकार | - | चित्रगीत |