नाचत नाचत गावे
नाचत नाचत गावे, ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावे
आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला
एक अनामिक आनंदाने जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे तन्मय होउन जावे
माझी मजला जाण नसावी अंतर माझे भोळे
अवघी काया वार्यावरती सूरच होऊन डोले
अणुरूपाने परमात्म्याला भेटुन मागे यावे
आयुष्याला उधळित जावे केवळ दुसर्यापायी
या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी एक मनाला ठावे
आज कशाची किमया घडली, कण कण गंधित झाला
एक अनामिक आनंदाने जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे तन्मय होउन जावे
माझी मजला जाण नसावी अंतर माझे भोळे
अवघी काया वार्यावरती सूरच होऊन डोले
अणुरूपाने परमात्म्याला भेटुन मागे यावे
आयुष्याला उधळित जावे केवळ दुसर्यापायी
या त्यागाच्या संतोषाला जगी या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठी एक मनाला ठावे
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | बाजीरावाचा बेटा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |