नाजुक ऐशा या जखमेला
नाजुक ऐशा या जखमेला
दवा नको पण दुवा हवा !
निर्लेप अशा हृदयावरती
मृदुल करांचा लेप हवा
या जखमेला तुझ्या प्रीतिचा
असा मुलायम मलम हवा !
नको कुणि वेदना विशारद
नको कुणि तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणि परि
प्रणयाचा मांत्रिक हवा !
दवा नको पण दुवा हवा !
निर्लेप अशा हृदयावरती
मृदुल करांचा लेप हवा
या जखमेला तुझ्या प्रीतिचा
असा मुलायम मलम हवा !
नको कुणि वेदना विशारद
नको कुणि तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणि परि
प्रणयाचा मांत्रिक हवा !
| गीत | - | प्र. के. अत्रे |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | पं. उदयराज गोडबोले |
| नाटक | - | अशी बायको हवी ! |
| गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












पं. उदयराज गोडबोले