A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाजुक मी फुलवेल

नाजुक मी फुलवेल ! सख्या रे,
तू येता, हसुनी बघता, मोहरूनी बहरेल

थांब जरा तू चंचल भ्रमरा
नकोस लावू मादक नजरा
बावरता हा जीव लाजरा
कळी कळी उमलेल

भार फुलांचा झाला मजला
तशात हृदयी सुगंध भरला
कोमल माझी प्रीती तुजला
सांग कशी बिलगेल?
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - तारका
गीत प्रकार - चित्रगीत