नाकात वाकडा नथीचा आकडा
नाकात वाकडा नथीचा आकडा
मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा
बंदोबस्त का ग केला एवढा?
बोलांचं माणिक, हसण्याचं हिरं
रत्नांनी भरला रूपाचा वाडा
तुझ्यावाणी वेडा, घालील दरोडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा
येऊन गुपचूप तोडीन कुलूप
अरं भलतेच नको रं बोलू उनाडा
घालीन दरोडा धुंडीन वाडा
पायांत पडंल रं जन्माचा खोडा
सोशीन खोडा हवा तेवढा
आधीच कशाला तंटाबखेडा
तुझा माझा जोडा, पायी घाल खोडा
अंगणी झडू दे सनई-चौघडा
मोत्यांचं कुलूप ओठांच्या कवाडा
बंदोबस्त का ग केला एवढा?
बोलांचं माणिक, हसण्याचं हिरं
रत्नांनी भरला रूपाचा वाडा
तुझ्यावाणी वेडा, घालील दरोडा
बंदोबस्त केला म्हणुन एवढा
येऊन गुपचूप तोडीन कुलूप
अरं भलतेच नको रं बोलू उनाडा
घालीन दरोडा धुंडीन वाडा
पायांत पडंल रं जन्माचा खोडा
सोशीन खोडा हवा तेवढा
आधीच कशाला तंटाबखेडा
तुझा माझा जोडा, पायी घाल खोडा
अंगणी झडू दे सनई-चौघडा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी |
चित्रपट | - | वैभव |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
कवाड | - | दरवाजाची फळी, दरवाजा. |
खोडा | - | गुन्हेगाराचे हातपाय अडकविण्याकरिता केलेली लाकडाची चौकट. |