नको बावरुनी जाऊ
एक एक पाऊल उचली, चाल निश्चयाने
नको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने !
पंख नाही दिधले मनुजा जरी ईश्वराने
खंत काय धरिली त्याची कधी मानवाने
अधांतरी उडती त्याच्या यशाची विमाने
सूर्य चंद्र नसता गगनी काजळे धरित्री
प्रकाशास कोंडी मानव वीज काचपात्री
तारकांस लाजविते ते दीप शामदाने
तुझ्या मागुती मी यावे, असे स्वप्न होते
पुढे होऊनिया आता तुला हात देते
ऊठ चाल बघसी का रे असा विस्मयाने
नको बावरुनी जाऊ नियतीच्या भयाने !
पंख नाही दिधले मनुजा जरी ईश्वराने
खंत काय धरिली त्याची कधी मानवाने
अधांतरी उडती त्याच्या यशाची विमाने
सूर्य चंद्र नसता गगनी काजळे धरित्री
प्रकाशास कोंडी मानव वीज काचपात्री
तारकांस लाजविते ते दीप शामदाने
तुझ्या मागुती मी यावे, असे स्वप्न होते
पुढे होऊनिया आता तुला हात देते
ऊठ चाल बघसी का रे असा विस्मयाने
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | स्नेहल भाटकर |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | अन्नपूर्णा |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, चित्रगीत |