A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नमन नटवरा विस्मयकारा

नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥

विवाह करुनी मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला ।
धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला ।
परमेशाच्या ऐशा लीला । कविकृष्ण गात विस्मयकारा ॥
इंदु - चंद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर