नसता माझ्या मनात काही
नसता माझ्या मनात काही
पाठलाग हा उगाच बाई
झाली नजरानजर जराशी
हसला तुम्ही, हसले मीही
यात वावगे झाले काही?
बघत सारखे येता पुढुनी
ओठ चावुनी मनात गढुनी
मान खालती घालुनि जाई
जाता जाता मागे वळुनी
तुम्हीच बघता आले कळुनी
सहज जेधवा पाही मीही
स्वाभाविक ही उसळुनि आली
लाज रंगुनी खेळत गाली
अर्थ तयाचा भलता होई
पदराचा हा लागुन वारा
कोट छातिचा तुमच्या सारा
कोसळुनि हा सदैव राही
पाठलाग हा उगाच बाई
झाली नजरानजर जराशी
हसला तुम्ही, हसले मीही
यात वावगे झाले काही?
बघत सारखे येता पुढुनी
ओठ चावुनी मनात गढुनी
मान खालती घालुनि जाई
जाता जाता मागे वळुनी
तुम्हीच बघता आले कळुनी
सहज जेधवा पाही मीही
स्वाभाविक ही उसळुनि आली
लाज रंगुनी खेळत गाली
अर्थ तयाचा भलता होई
पदराचा हा लागुन वारा
कोट छातिचा तुमच्या सारा
कोसळुनि हा सदैव राही
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | नलिनी मुळगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत |
कोट | - | तट, मजबूत भिंत. |
जेधवा | - | जेव्हा. |