नशीब शिकंदर माझे
नशीब शिकंदर माझे, राज्यपद आले
पट्टराणी तुमची मी झाले, तुम्ही महाराजे
कोहिनूर हिर्यांमधी हिरा
फुलांमध्ये फूल मोगरा
लाखो राजात राजेश्वरा
नवकोट मोत्यांचा तुरा मंदिली साजे
सोन्याचे कळस गोपुरी
झळकती राज्यमंदिरी
स्वारी आली तुमची दरबारी
पंचखंडात होई ललकारी चौघडा वाजे
रत्नमण्यांच्या सिंहासनी
तुम्ही इंद्र मी इंद्रायणी
कुबेरानं दिली खंडणी
देव उभे हात जोडुनी, मांडलिक राजे
पट्टराणी तुमची मी झाले, तुम्ही महाराजे
कोहिनूर हिर्यांमधी हिरा
फुलांमध्ये फूल मोगरा
लाखो राजात राजेश्वरा
नवकोट मोत्यांचा तुरा मंदिली साजे
सोन्याचे कळस गोपुरी
झळकती राज्यमंदिरी
स्वारी आली तुमची दरबारी
पंचखंडात होई ललकारी चौघडा वाजे
रत्नमण्यांच्या सिंहासनी
तुम्ही इंद्र मी इंद्रायणी
कुबेरानं दिली खंडणी
देव उभे हात जोडुनी, मांडलिक राजे
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभू |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | पाटलाचा पोर |
गीत प्रकार | - | लावणी, चित्रगीत |
इंद्राणी | - | इंद्र पत्नी- शची. |
गोपुर | - | देवळाचे मुख्य दार. |
पट्टराणी | - | मुख्य राणी अथवा अभिषिक्त राणी. |
मंदिल | - | जरीचे पागोटे. |
मांडलिक | - | सार्वभौम राजाच्या ताब्यातला राजा. |
शिकंदर नशीब असणे | - | दैव अनुकूल असणे. |
Print option will come back soon