A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाते जुळले मनाशी मनाचे

नाते जुळले मनाशी मनाचे
फुले गीत ओठी अनोख्या सुरांचे

कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी
तुझ्या अंतरीची अबोली कहाणी?
कसे फूल झाले दिवाण्या कळीचे?

जुळे ही मिठी बावर्‍या लोचनांची
जशी भेट होते नदी-सागराची
मनी नाचती हे रंग अमृताचे

उरे ध्यास भवती नुरे भान काही
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
सखे रूप दिसले मला नंदनाचे
नंदन - इंद्राचे नंदनवन.
नुरणे - न उरणे.

 

Random song suggestion
  जयवंत कुलकर्णी