नयनात तुझ्या सखि
नयनात तुझ्या सखि सावन का?
ही प्रीत न अपुली पावन का?
तुझ्या नि माझ्या दोघांच्या मनी
एक भावना जाय थरारुनी
सांजरंग हे जाती रंगवुनी आज अपुले जीवन का?
नवथर लज्जा, नव अभिलाषा
गाली रेखिती तुझिया रेषा
अश्रू गाळुनी ऐसे नयनी करिती प्रीती साधन का?
ओघळलेल्या अश्रूबिदुंनी
नावगाव तव जाईल वाहुनी
सकलही मजला मंगलक्षणी ग तुझाच म्हणतिल साजण का?

गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | अनिल मोहिले |
स्वर | - | दशरथ पुजारी |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |
अभिलाष(षा) | - | इच्छा, लालसा / तृष्णा. |