A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निळे गगन निळी धरा

निळे गगन निळी धरा निळेनिळे पाणी
ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी

माती ही मायमाउली
गंधाने चिंब नाहली
वारसा तिचा, खरा दास मी तिचा
नाती ही आमुची पुराणी

हिरवळ ही मुक्या मनाची
पांघरते शाल उन्हाची
झाड डोलते, हळू पान बोलते
फांदीवरी कुहूकुहू गाणी

हुंदडती गायवासरे
बागडती चिमण पाखरे
मुलाफुलांची, अशी चिलापिलांची
दुनिया ही भाबडी अडाणी

आनंदी जिणे जगावे
अंतर उजळून निघावे
प्रेम लुटावे, असे गात सुटावे
सोडवीत सुखाची उखाणी
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - एन्‌. दत्ता
स्वर- जयवंत कुलकर्णी
चित्रपट - मामा भाचे
गीत प्रकार - चित्रगीत
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.