A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ओळख पहिली गाली हसते

ओळख पहिली गाली हसते
सांग दर्पणा कशी मी दिसते

आषाढीच्या तिन्हीसांजेला
पैलतिरी त्या पाणवठ्याला
बघुनी ज्याला जीव लाजला
आठवण त्याची हृदयी ठसते

नाव जयाचे घुमता कानी
चित्र रंगते मिटल्या नयनी
बाहुपाशी जाता विरुनी
माझ्यावर मी जेव्हा रुसते

करी बांगडी राजवार्खी
नथणी-बुगडी तुझ्यासारखी
तुझ्यापरी तो रत्‍नपारखी
म्हणुनी तुजला घडी घडी पुसते
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभु
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत
बुगडी - स्‍त्रियांचे कर्णभूषण.
राजवर्खी बांगडी - एक प्रकारची चकचकीत नक्षीदार बांगडी.