पाहू द्या रे मज विठोबाचे
पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा
घालू घननीळा आवडिने ॥
नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा
डोळिंया पारण होत असे ॥
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा
घालू घननीळा आवडिने ॥
नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा
डोळिंया पारण होत असे ॥
गीत | - | अशोकजी परांजपे |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
नाटक | - | गोरा कुंभार |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, विठ्ठल विठ्ठल, नयनांच्या कोंदणी |
कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
बरवा | - | सुंदर / छान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.