A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पक पक पकाक

पक पक पक पक पकाक पक
आज काही नाही कामात उरक

काल तुला पाहिली
आस मनी राहिली
तुझी नि माझी व्हावी वळख

लाखाहुनी न्यारा
तुझा गडे तोरा
डोळ्यांत काही न्यारी चमक

वय तुझं चौदा
लहान पोरसवदा
चालण्यात बोलण्यात न्यारी लचक

गोरा तुझा रंग
लुसलुशीत अंग
ओठांची ठेवण तांबडीभडक

तुझ्या गालावर तीळ
माझ्या ओठांत शीळ
तुझं तूच हे गुपित वळख