A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पंढरीचे जन अवघें

पंढरीचे जन अवघें पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥

विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥

विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥

नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें ।
विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
निधान - खजिना / स्थान.
बुडी देणे - बुद्धिपुर:सर पाण्यात शिरणे / काही काळ पळून जाऊन लपून राहणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.