पंख जरी जळलेले
पंख जरी जळलेले नील नवे पाहीन मी
मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी
काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे
किरणांच्या स्पर्शाने पक्षाला कंठ फुटे
राखेतुन उंच उडून गगनशीरी जाईन मी
मी म्हंटले ईश्वरास जळताना ज्वालांवर
नाचणार नाही मी सबळांच्या तालावर
अक्रोशत एकाकी विजनांतच राहीन मी
धडधडून प्रलयाग्नी आला जर घेत घास
निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेत-रास
शेवटला उंच सूर मुक्तीला वाहीन मी
मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी
काजळल्या आभाळी गवसावा सूर कुठे
किरणांच्या स्पर्शाने पक्षाला कंठ फुटे
राखेतुन उंच उडून गगनशीरी जाईन मी
मी म्हंटले ईश्वरास जळताना ज्वालांवर
नाचणार नाही मी सबळांच्या तालावर
अक्रोशत एकाकी विजनांतच राहीन मी
धडधडून प्रलयाग्नी आला जर घेत घास
निर्जनात पक्ष्यांची पडली जर प्रेत-रास
शेवटला उंच सूर मुक्तीला वाहीन मी
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | उदय चितळे |
स्वर | - | विनायक जोशी |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
विजन | - | ओसाड, निर्जन. |