A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पत्र पहिले वाचते

मी अशी होऊन वेडी पत्र पहिले वाचते
सावळे ग रूप त्यांचे नयनी माझ्या खेळते

मोतियांच्या अक्षरांच्या दिव्यमाला शोभती
लाजरे ग नेत्र त्यांचे मधुनी दिसती, हासती
ओळी ओळीतील त्यांचे भाव भोळे जाणते
पत्र पहिले वाचते

पारिजाताचा तयांचा स्पर्श मजला आठवे
स्पर्शसौगंधा तयांनी धाडिले पत्रासवे
मी अबोली होउनिया सारखी ग लाजते
पत्र पहिले वाचते

लाजते मी, दूर जरी ते येथुनी मी बोलते
हे निळे ग गूज त्यांचे हृदयी माझ्या कोरते
गीत उमले ओठी माझ्या, गाली हासू दाटते
पत्र पहिले वाचते

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.