फिरते रूपयाभवती दुनिया
गोल असे ही दुनिया आणिक गोल असे रूपया
सूर्य फिरे हा पृथ्वीभवती, फिरते रूपयाभवती दुनिया
फसवाफसवी करून लबाड्या, धनिकांच्या त्या चालती पेढ्या
हवेशीर त्या रंगीत माड्या, गरिबाला नच थारा वेड्या
नसता जवळी माया
फिरते रूपयाभवती दुनिया
मजूर राबती हुजूर हासती, घामावरती दाम वेचिती
तिकिटावरती अश्व धावती, पोटासाठी करिती विक्रय-
अबला अपुली काया
फिरते रूपयाभवती दुनिया
नाण्यावरती नाचे मैना, अभिमानाच्या झुकती माना
झोपडीत ते बाळ भुकेले, दूध तयाला पाजायास्तव-
नाही कवडी-माया

गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | गोविंद पोवळे |
स्वर | - | गोविंद पोवळे |
गीत प्रकार | - | भावगीत |