पिकलं जांभूळ तोडू नका
गळला मोहर झडली पालवी
फळे लागली निळी जांभळी
पिकलं जांभूळ तोडू नका
माझ्या झाडावरती चढू नका
मला चोरांची भीती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते
घातलं कुंपण मोडू नका
कुणी झाडावरती चढू नका
झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजुला जरासं झुकलं
झुकल्या फांदीला ओढू नका
कुणी झाडावरती चढू नका
भारी पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं
इश्काच्या मार्यानं पाडू नका
कुणी झाडावरती चढू नका
फळे लागली निळी जांभळी
पिकलं जांभूळ तोडू नका
माझ्या झाडावरती चढू नका
मला चोरांची भीती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते
घातलं कुंपण मोडू नका
कुणी झाडावरती चढू नका
झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजुला जरासं झुकलं
झुकल्या फांदीला ओढू नका
कुणी झाडावरती चढू नका
भारी पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं
इश्काच्या मार्यानं पाडू नका
कुणी झाडावरती चढू नका
गीत | - | राजेश मुजुमदार |
संगीत | - | रामलक्ष्मण |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | बोट लावीन तिथं गुदगुल्या |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |