A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्राणविसावा लहरि सजण

प्राणविसावा! लहरी सजण कुणी दावा!
फिरुन घरी यावा
पावसाची हवा
ओढ लावी जीवा
शितळ शिडकावा!

कठिण दुरावा, सहन अजून किती व्हावा
धरुन धिरावा?
प्राण वेडापिसा
एकलीने कसा-
समय गुजारावा?

बहर फुलावा, फुलुन फुलुन विखरावा
हृदयि धरावा
कळ्या-पाकळ्या
पाहता मोकळ्या
भरुन उर यावा!