प्रपंच
मायबाप ! मायबाप !
माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबाप ! मायबाप !
तू नसल्याचा भास पसरला चहूकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबाप ! मायबाप !
सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
त्या हसण्या-रडण्यामाधुनी तू बहर जरा
मायबाप ! मायबाप !
या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबाप ! मायबाप !
रडता रडता या ओठांवर कधीतरी
हसण्याचाही कर जरासा कहर जरा
मायबाप ! मायबाप !
अंगण होईल देव्हार्यासम पावन हे
वेलीवरल्या पानांफुलांतून डवर जरा
मायबाप ! मायबाप !
माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबाप ! मायबाप !
तू नसल्याचा भास पसरला चहूकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबाप ! मायबाप !
सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
त्या हसण्या-रडण्यामाधुनी तू बहर जरा
मायबाप ! मायबाप !
या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबाप ! मायबाप !
रडता रडता या ओठांवर कधीतरी
हसण्याचाही कर जरासा कहर जरा
मायबाप ! मायबाप !
अंगण होईल देव्हार्यासम पावन हे
वेलीवरल्या पानांफुलांतून डवर जरा
मायबाप ! मायबाप !
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | राहुल रानडे |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- प्रपंच, वाहिनी- झी मराठी. • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |