प्रीती तुझी मनमोहिनी
प्रीती तुझी मनमोहिनी, फुलवी मनी संजीवनी
पारिजात बहरुनी आला
धुंद तुझ्या स्पर्शामधुनी
प्रेमरंगी मोहरलेला
दीपराग नाचे नयनी
भारावल्या देहातुनी, झंकारली सौदामिनी
साद तुझी जादूभरी
फुले उरी बाधा कसली?
लाट ही सुखाची माझ्या
जीवनात भरुनी उरली
तू राधिका गे नंदिनी, हृदयातल्या या वृंदावनी
पारिजात बहरुनी आला
धुंद तुझ्या स्पर्शामधुनी
प्रेमरंगी मोहरलेला
दीपराग नाचे नयनी
भारावल्या देहातुनी, झंकारली सौदामिनी
साद तुझी जादूभरी
फुले उरी बाधा कसली?
लाट ही सुखाची माझ्या
जीवनात भरुनी उरली
तू राधिका गे नंदिनी, हृदयातल्या या वृंदावनी
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | प्रदीप-विलास |
स्वर | - | हेमंतकुमार |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत |
सौदामिनी | - | वीज. |