प्रिया साहवेना आता
प्रिया साहवेना आता एकलेपणा
अशा पौर्णिमेच्या रात्री, कसा दाह होतो गात्री, सांगू रे कुणा
आता सांगू रे कुणा
घातली जुईची वेणी तुझ्या आवडीची
वाट पाहताहे गंध तुझ्या मीलनाची
जरा शोध घे रे वार्या, कुठे सांडल्या रे सार्या प्रीतीच्या खुणा
सार्या प्रीतीच्या खुणा
येईना कशी रे कानी तुझी आर्त साद
काय बोलले मी, माझा कोणता प्रमाद
तुझे मौन कैसे साहू, नको यापरी दुखावू पोळल्या मना
माझ्या पोळल्या मना

| गीत | - | यशवंत देव |
| संगीत | - | अनिल-अरुण |
| स्वर | - | अनुराधा पौडवाल |
| गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
| आर्त | - | दु:ख, पीडा. |
| गात्र | - | शरीराचा अवयव. |
| प्रमाद | - | अपराध / चूक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

अनुराधा पौडवाल