रात आज झिंगली
रात आज झिंगली, प्रीत आज रंगली
मन वेडे गुंतले आज तुझ्या कुंतली
टिपुन तूच घेतले चांदणे नभांतले
रातराणी आज ही बहरली तुझ्यामुळे
चांदणी झुरे मनी मुग्ध पाहुनी खळी
प्रीत आज रंगली !
लाजरे गुलाब दोन गालांवर लाजले
रंग-कुंचल्याविना चित्र कसे साधले
अमूर्त काय कल्पना, मूर्त आज या स्थली
प्रीत आज रंगली !
मन वेडे गुंतले आज तुझ्या कुंतली
टिपुन तूच घेतले चांदणे नभांतले
रातराणी आज ही बहरली तुझ्यामुळे
चांदणी झुरे मनी मुग्ध पाहुनी खळी
प्रीत आज रंगली !
लाजरे गुलाब दोन गालांवर लाजले
रंग-कुंचल्याविना चित्र कसे साधले
अमूर्त काय कल्पना, मूर्त आज या स्थली
प्रीत आज रंगली !
| गीत | - | मधुसूदन कालेलकर |
| संगीत | - | सुधीर फडके |
| स्वर | - | सुधीर फडके |
| चित्रपट | - | लग्नाला जातों मी |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे |
| कुंचला | - | रंग देण्याचा ब्रश. |
| कुंतल | - | केस. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुधीर फडके