A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या

रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत

मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
अनन्य - एकरूप / एकटा.
डंका - (डांका) कीर्ती, ख्याती / मोठा नगारा.
दिगंतर - सर्वदूर.

 

Print option will come back soon