राधा कृष्णावरी भाळली
राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी
अमृतवृक्षी फुलला मोहर
कोकिळकंठी फुटला सुस्वर
कुंजवनातून फुलाफुलातून
नवलकथा दरवळली
वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्तीची ओढ तियेची
नीलजळी थयथयली
अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरी अधरीची वेणु वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली
गुजगुज उठली गोकुळी
अमृतवृक्षी फुलला मोहर
कोकिळकंठी फुटला सुस्वर
कुंजवनातून फुलाफुलातून
नवलकथा दरवळली
वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्तीची ओढ तियेची
नीलजळी थयथयली
अमरप्रीतीचे गीत लाघवी
हरी अधरीची वेणु वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कुंज | - | वेलींचा मांडव. |
कालिंदी | - | यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते. |
गुजगुज | - | कुजबुज. |
वेणु | - | बासरी. |