A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राइतल्या रावळात

राइतल्या रावळात, देवीच्या देवळात, सनई अन्‌ चौघडा
राइबाइ घ्या कमरेवर घडा
सइबाइ घ्या डोईवर घडा
सखुबाइ घुम्‌घुम्‌ घुमवू घडा
घुम्‌घुम्‌ घागर घुमवू घडिभर वाहुन कुंकूपुडा

बसलाय्‌ घट हो अस्विन हसलाय्‌
मोत्याचा डोंगर मळ्यात दिसलाय्‌
आभाळ उघडलंय्‌ निशाण चढलंय्‌ अंबाबाइच्या गडा

धरतरि मावली नवसाला पावली
आभाळ धरतंय सुखाची सावली
घरधनि खुशिमधे, हसत्याल मिशिमधे, रंगंल तुमचा विडा
राई - अरण्य, झाडी / मोहरी.
राऊळ - देऊळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.