राजाच्या रंगम्हाली
राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग
रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी
जरीचा चांदवा रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी ती रुसली
बोलं ना, हसं ना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं
डोळ्यांची कमळं उघडा व्हटांची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल कशाला बडिवार
मायेच्या पूतापायी रानी ग रडीते
आसवांची गंगा व्हाते भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली पराची मऊ गादी
जरीचा चांदवा रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी ती रुसली
बोलं ना, हसं ना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली राजानं पुशिलं
डोळ्यांची कमळं उघडा व्हटांची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
राजाच्या रंगम्हाली रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल कशाला बडिवार
मायेच्या पूतापायी रानी ग रडीते
आसवांची गंगा व्हाते भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी ग
गीत | - | योगेश |
संगीत | - | आनंदघन |
स्वर | - | उषा मंगेशकर, लता मंगेशकर |
चित्रपट | - | साधी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
बडिवार | - | प्रतिष्ठा / मोठेपणा. |
Print option will come back soon