राम सर्वांगी सांवळा
राम सर्वांगी सांवळा । हेमअलंकारें पिवळा ।
नाना रत्नांचियां किळा । अलंकार शोभतीं ॥१॥
पिवळा मुकुट किरीटी । पिवळें केशर लल्लाटीं ।
पिवळ्या कुंडलांच्या थाटी । पिवळ्या कंठी वनमाळा ॥२॥
पिवळें पदक करभूषणें । बाहुवटीं करकंकणे ।
पिवळ्या मुद्रिकांचे लेणे । पिवळें करीं शरचाप ॥३॥
पिवळा कांसे पितांबर । पिवळया ब्रीदांचा तोडर ।
पिवळ्या घंटांचा गजर । पिवळ्या वाक्या साजती ॥४॥
पिवळा मंडप विस्तीर्ण । पिवळें मध्ये सिंहासन ।
राम सीता लक्ष्मण । दास गुण गातसे ॥५॥

| गीत | - | समर्थ रामदास |
| संगीत | - | गोविंद पोवळे |
| स्वर | - | गोविंद पोवळे |
| गीत प्रकार | - | संतवाणी, राम निरंजन |
| कुंडल | - | कानात घालायचे आभूषण. |
| कांस | - | कंबर / कासोटा, ओटी. |
| किरीट | - | मुकुट. |
| चाप | - | धनुष्य. |
| तोडर | - | पायात घालायचे तोडे. |
| थाटी | - | गर्दी. |
| ब्रीद | - | प्रतिज्ञा / कडे. |
| बाहुवट | - | दंडात घालण्याचा अलंकार. |
| मुद्रिका | - | अंगठी. |
| रत्नकीळ | - | रत्नांची कांती. |
| ललाट | - | कपाळ. |
| शर | - | बाण. |
| हेम | - | सोने. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

गोविंद पोवळे