A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रामचंद्र मनमोहन नेत्र भरुन

रामचंद्र मनमोहन, नेत्र भरुन पाहिन काय?

सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास
सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय?

आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे
मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय?

जाउ तरी कोणास शरण, करील कोण दु:ख हरण
मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय?

अशनि राम, पाणि राम, वदनि राम, नयनी राम
ध्यानी-मनी एक राम, वृत्ती राम जाणिल काय?
मानस - मन / चित्त / मानस सरोवर.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.