रंग तुझा सावळा दे मला
रंग तुझा सावळा
दे मला, गोविंदा घननिळा
तुझ्या रूपाचे नयनी काजळ
सूर मुरलीचे कानी कुंडल
मुग्ध मनाची करुनी ओंजळ करिते अर्पण तुला
तरूतळी या कुंजवनातुन
तू गोरा मी काळी होऊन
गोपी-कृष्ण हा गोफ गुंफुन करु दे नर्तन मला
तुझिया चरणी क्षणी एकान्ती
धुंद जळी या यमुनाकाठी
माझी भक्ती होऊन मुक्ती करु दे मधुकर ताला
दे मला, गोविंदा घननिळा
तुझ्या रूपाचे नयनी काजळ
सूर मुरलीचे कानी कुंडल
मुग्ध मनाची करुनी ओंजळ करिते अर्पण तुला
तरूतळी या कुंजवनातुन
तू गोरा मी काळी होऊन
गोपी-कृष्ण हा गोफ गुंफुन करु दे नर्तन मला
तुझिया चरणी क्षणी एकान्ती
धुंद जळी या यमुनाकाठी
माझी भक्ती होऊन मुक्ती करु दे मधुकर ताला
गीत | - | रमेश अणावकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कुंडल | - | कानात घालायचे आभूषण. |