रात्री स्वप्न मला पडले
रात्री स्वप्न मला पडले
स्वप्नी नवल एक घडले
सज्ज मंडपी सनई वाजे
मनातल्या मी मनात लाजे
चालत होते त्यांच्या मागून सप्तपदीची सात पाऊले
अंतरपाट तो दोघां मधला
गुपित मनीचे अनुसा वदला
सौख्यभराने जगात नांदा प्रेमळ माता-पिता बोलले
वधुवरांची वरात सजली
नगरामधुनी वाजत फिरली
उंबरठ्यावरी माप सांडुनी घरामधे मी त्यांच्या आले

गीत | - | |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
चित्रपट | - | चला उठा लग्न करा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, कल्पनेचा कुंचला |