रिमझिम धून आभाळ भरून
रिमझिम धून आभाळ भरून
हरवले मन, येणार हे कोण?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यांत हरवून
गुज मनींचे मनाला, आठवुनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनांत बावरून
वार्यांत गाणें कुणाचे, गाण्यात वारें मनाचे
मनाच्या वार्यांत आतां, सुरांत तुला मी कवळून
हरवले मन, येणार हे कोण?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यांत हरवून
गुज मनींचे मनाला, आठवुनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनांत बावरून
वार्यांत गाणें कुणाचे, गाण्यात वारें मनाचे
मनाच्या वार्यांत आतां, सुरांत तुला मी कवळून
गीत | - | सौमित्र |
संगीत | - | मिलिंद इंगळे |
स्वर | - | मिलिंद इंगळे |
गीत प्रकार | - | ऋतू बरवा, भावगीत |