रुमझुम पैंजण नाद
रुमझुम पैंजण नाद सुमोहन नाचत आले रे
रंग अजूनही फुलाफुलांवर नवथर ओले रे
रुणझुण मनघन आर्त सुलोचन लाजण झाले रे
त्यात सावली तुझ्या रुपाची काजळ न्हाले रे
उठले वारे मनभरणारे कुठुन आले रे
आंदोलत रेशीम झुल्याचे लवथव दोले रे
तुझे अनावर मुक्त मनोहर मोर निघाले रे
त्यात कोवळे निळे-जांभळे छंद निमाले रे
रंग अजूनही फुलाफुलांवर नवथर ओले रे
रुणझुण मनघन आर्त सुलोचन लाजण झाले रे
त्यात सावली तुझ्या रुपाची काजळ न्हाले रे
उठले वारे मनभरणारे कुठुन आले रे
आंदोलत रेशीम झुल्याचे लवथव दोले रे
तुझे अनावर मुक्त मनोहर मोर निघाले रे
त्यात कोवळे निळे-जांभळे छंद निमाले रे
गीत | - | अशोक बागवे |
संगीत | - | कौशल इनामदार |
स्वर | - | सोनाली कर्णिक |
गीत प्रकार | - | भावगीत |
दोला (आंदोला) | - | झोका. |
नवथर | - | नवीन. |
Print option will come back soon