A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रुणझुणत्या पांखरा (२)

रुणझुणत्या पांखरा, तू जा माझ्या माहेरा!

सांग जा आईला, तू सांग जा भाईला
सांग जा वहिनीला, तू सांग जा बहिणीला
गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा!

चांदीच्या तोड्यांत बाई चंदेरी साड्यांत
चौसोपी वाड्यांत मी हिंडते माड्यांत
आनंदी ग नणंदा, माझा मायाळू सासरा!

हौसेनें वागतें मी सेवेला जागतें
गोडीनं नांदते मी सुख सारे भोगते
रुणझुणत्या पांखरा, तू जा माझ्या माहेरा!
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
चित्रपट- जिवाचा सखा
गीत प्रकार - चित्रगीत
भर्तार (भर्ता) - नवरा, पती / स्वामी.

 

Random song suggestion
  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.