सैनिका तुझ्या यशात धुंद
सैनिका तुझ्या यशात धुंद चौघडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
चहूदिशांत पेटता पिसाट वादळे
रक्ताचे घोट पिऊन माखता चुडे
तूच मत्त सैताना चारिले खडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
अबलांना तू आधार, दीनबंधू तू
कोटी घरांस्तव घरकुल मोडिलेस तू
सहजसुखे प्राणांचे शिंपिले सडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
शांतीसूक्तही समर्थ हो तुझ्यामुळे
चिरंतनास आश्वासन तू तुझ्या बळे
तुझ्यामूळेच राष्ट्र निघे उगवतीकडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
कुजलेल्या चैतन्या येई जागृती
पेरलीस अस्मिता नवीन भारती
अखंड सावधानता मंत्र आज रे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
चहूदिशांत पेटता पिसाट वादळे
रक्ताचे घोट पिऊन माखता चुडे
तूच मत्त सैताना चारिले खडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
अबलांना तू आधार, दीनबंधू तू
कोटी घरांस्तव घरकुल मोडिलेस तू
सहजसुखे प्राणांचे शिंपिले सडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
शांतीसूक्तही समर्थ हो तुझ्यामुळे
चिरंतनास आश्वासन तू तुझ्या बळे
तुझ्यामूळेच राष्ट्र निघे उगवतीकडे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
कुजलेल्या चैतन्या येई जागृती
पेरलीस अस्मिता नवीन भारती
अखंड सावधानता मंत्र आज रे
विजयगीत घोषवित चाल तू पुढे
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | विश्वनाथ ओक |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
अस्मिता | - | स्वत्व, स्वाभिमान. |