शिंग फुंकिले रणी
शिंग फुंकिले रणी
वाजतात चौघडे
सज्ज व्हा, उठा उठा
सैन्य चालले पुढे
दास्यकाल संपला
शांत काय झोपला?
अग्नि येथ कोपला
पेटुनी नभा भिडे
शिर घेउनी करी
दंग होउ संगरी
घालवूच हा अरी
सागरापलीकडे
लोकमान्य केसरी
गर्जतात वैखरी
माजला असे अरी
चारु त्याजला खडे
वीस सालचा लढा
जाहला किती बडा
इंग्रजास बेरडा
आणिले कसे रडे
तीस सालची प्रभा
उज्ज्वला भरे नभा
गांधी अग्रणी उभा
ठाकला रणी पुढे
जीर्ण वृक्ष हालला
घाव घालण्या चला
तोडण्यास शृंखला
जोम हा नवा चढे
वाजतात चौघडे
सज्ज व्हा, उठा उठा
सैन्य चालले पुढे
दास्यकाल संपला
शांत काय झोपला?
अग्नि येथ कोपला
पेटुनी नभा भिडे
शिर घेउनी करी
दंग होउ संगरी
घालवूच हा अरी
सागरापलीकडे
लोकमान्य केसरी
गर्जतात वैखरी
माजला असे अरी
चारु त्याजला खडे
वीस सालचा लढा
जाहला किती बडा
इंग्रजास बेरडा
आणिले कसे रडे
तीस सालची प्रभा
उज्ज्वला भरे नभा
गांधी अग्रणी उभा
ठाकला रणी पुढे
जीर्ण वृक्ष हालला
घाव घालण्या चला
तोडण्यास शृंखला
जोम हा नवा चढे
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | गोविंद कुरवाळीकर |
स्वर | - | गोविंद कुरवाळीकर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
अग्रणी | - | नेता, मुख्य. |
अरि | - | शत्रु. |
केसरी | - | सिंह. |
ठाकणे, ठाके | - | थांबणे / स्थिर होणे. |
प्रभा | - | तेज / प्रकाश. |
बेरड | - | डांबरट, कोडगा. |
वैखरी | - | वाणी, भाषा. |
संगर | - | युद्ध. |
Print option will come back soon