सजल नयन नित धार
सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती
वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती
चंद्र-चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना विषधारा होती
थकले पैंजण चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतीची फुले प्रेमले
अजून उखाणे मला घालिती
भावगंध त्या जळी मिसळती
वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती
चंद्र-चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविना विषधारा होती
थकले पैंजण चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतीची फुले प्रेमले
अजून उखाणे मला घालिती
गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
राग | - | मिश्र भैरवी |
गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी |