A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सजणाच्या मर्जीखातर

सजणाच्या मर्जीखातर, जरासा वर धरिला अंबाडा
उघडीच ठेवली मान, केतकी पान सोनकेवडा !

घातला वेश पंजाबी तंग सलवार
रेशमी खमीज अंगात सैल दळदार
झिरझिरित दुपट्टा वरी, टिकेना उरी, पडे तोकडा

पावडरचा मुखावर थर एक पातळ
किरमिजी रंगले ओठ, नयनी काजळ
मुळचेच गाल मखमली, चाखतो लाली तीळ चोंबडा !

ऐन्यात पहाता मुखा, सुखाची लहर
डोलते रान मोहरीचे फुलांना बहर
असल्यात येई राजसा, चेतल्या नसा नाचु भांगडा !