A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखुबाई साळुबाई बारशाला

सखुबाई साळुबाई बारशाला चला
तुम्ही बारशाला चला

पाहुणा आला नवा, त्याला नाव ठेवा
झाकलेल्या मुठीत लपवतो गुपित
सांगेना मला, तुम्ही तरी चला

मोटर आणली दारात, चालवा जरा जोरात
रंग आहे नवा पण चाकात नाही हवा
पेट्रोल तेवढं घाला आणि बारशाला चला

कंठा झाला नामी, त्यात हिरे झाले कमी
कुड्या चकाकती त्यात साडेतीन मोती
शालू नेसा निळा, ठिगळं जोडा सोळा, बारशाला चला

रेशनचे गहू, त्याच्या पोळ्या केल्या नऊ
भात झाला चिकट, घुगर्‍या झाल्या तिखट
गोडीनं खाऊ, आशीर्वाद देऊ
नंदाच्या घरी आज बाळराजा आला

सखुबाई साळुबाई बारशाला चला
तुम्ही बारशाला चला

कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर- नटवर्य जोग
चित्रपट - नवरा बायको
गीत प्रकार - चित्रगीत
घुगरी - चण्याची उसळ. (घुगर्‍या - बाळाच्या बारशाला वाटतात ते उकडलेले काळे चणे.)