A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
समयी सखा न ये

समयी सखा न ये । मी जात फसुनि आतां गे ।
बघत वाट थकलें । मी दारिं बसुनि आतां गे ॥

मानि ना आतां गोडी गुलाबी पुन्हां ।
सख्याशीं मांडिलें मी युद्ध रुसुनि आतां गे ॥

गांठ होतांचि या । शत्रुकंठी पाश हा ।
आलिंगनाचा । फेकीन कसुनि आतां गे ॥

दूति जा सांग । आलांत जा तसेची ।
प्रिया रडवीनची । मी हंसुनि हंसुनि आतां गे ॥
गीत - स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- मास्टर दीनानाथ
नाटक - सन्यस्त खड्ग
चाल-न पयाम आता है
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.