सांग धावत्या जळा
सांग धावत्या जळा
तुझ्यापरी ओढ उरी सांग कुणाची मला?
लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा
हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला तुझ्या मनाचा लळा
पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा राव शंतनु खुळा
तुझ्यापरी ओढ उरी सांग कुणाची मला?
लुकलुकणारी नेत्र मासळी
तुझ्या जीवनी कशी हरपली
मोहुनिया तिला धराया, जीव लाविते गळा
हर्ष फुलांचे उधळित झेले
तुझे मनोगत कुठे चालले
या धरतीला कसा लागला तुझ्या मनाचा लळा
पाणवठी या अशीच सखया
धीवरकन्या करता मृगया
कसा जाहला सांग प्रेमळा राव शंतनु खुळा
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | गृहदेवता |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
झेला | - | गुच्छ / नक्षी. |
धीवर | - | मासे पकडणारा कोळी. |