सांग सजणा सांग मला रे
सांग सजणा, सांग मला रे
काय जाहले आज तुला रे
पहिल्या रात्रीचा होता गंध सुगंधी
पहिल्या स्पर्शाची मस्ती आठव धुंदी
आढेवेढे सोड सांग काय गुन्हा केला
गोरी गोरी तनू माझी जवळ ये ना
नाटक नको करू मिठीत घे ना
ओठांना लाव या ओठांचा प्याला
बहरल्या यौवनाला आज आली जाग
भाव उरी भडकला पेटली आग
तुझ्या संगतीसाठी रे जीव वेडा झाला
काय जाहले आज तुला रे
पहिल्या रात्रीचा होता गंध सुगंधी
पहिल्या स्पर्शाची मस्ती आठव धुंदी
आढेवेढे सोड सांग काय गुन्हा केला
गोरी गोरी तनू माझी जवळ ये ना
नाटक नको करू मिठीत घे ना
ओठांना लाव या ओठांचा प्याला
बहरल्या यौवनाला आज आली जाग
भाव उरी भडकला पेटली आग
तुझ्या संगतीसाठी रे जीव वेडा झाला
गीत | - | मा. दा. देवकाते |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | थापाड्या |
गीत प्रकार | - | चित्रगीत |